>> प्रसाद नायगावकर
केंद्र सरकारने हिट ॲन्ड रन केस प्रकरणी 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. ज्याच्याविरोधात चालक-मालक संघाने अनेक ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. हा कायदा ड्रायव्हरांच्या हिताचा नाही, असं वाहन चालकांचे म्हणणं आहे. तसेच नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या चालकाने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर सोडल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होणार आहे. मात्र, अपघात घडवून आणणाऱ्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होईल.
या नवीन कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया वाहन चालक – मालक महासंघ पुसदच्या शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाहतूक सुरळीत केली.
कायदा रद्द करावा अश्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद यानं दिले आहे.यावेळी पुसद येथील चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.