श्री जगन्नाथ मंदिरात ड्रेस कोड लागू

ओडिशा राज्यातील 12 व्या शतकातील श्री जगन्नाथ मंदिरात प्रशासनाने 1 जानेवारी 2024 पासून दर्शन घेण्यासाठी येणाऱया भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. मंदिरात येणाऱया भाविकांनी व्यवस्थित कपडे घालून न आल्यास त्यांना दर्शन घेऊ दिले जाणार नाही. फाटकी जीन्स, स्कर्ट, निकर आणि पारदर्शी कपडे घालून येणाऱया भाविकांना दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मंदिरात आलेल्या भाविकांनी गुटखा आणि पान खाणे, प्लॅस्टिक तसेच पॉलिथिनचा वापर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.