कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या केरळ येथील जयहिंद कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड चॅनलला सीबीआयने नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्या कंपनीकडून गुंतवणुकीची माहिती सीबीआयने मागवली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना 11 जानेवारीपर्यंत सीबीआयच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.