सोलापूर मनपाचे 100 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण; मिळकतदारांना मिळाली 4 कोटींची शास्तीमाफी

सोलापूर महापालिका कर संकलन विभागाच्या ‘अभय योजने’ला नागरिकांतून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, शेवटच्या दिवस अखेर 34 दिवसांत एकूण 68 कोटी 35 लाख 74 हजार रुपये कर महापालिका तिजोरीत जमा झाला. शेकटच्या दिवशी रविवारी दिवसभरात 7 कोटी 63 लाख 36 हजार 528 रुपये करभरणा झाला. संबंधित मिळकतदारांना सुमारे 40.52 कोटी रुपये शास्तीमाफीचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, सुट्टीसह एकूण 108 कोटी रुपये कर जमा झाला आहे. महापालिकेचे 100 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल मध्यरात्री नववर्ष आरंभी केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशीष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकतकर विभागाकडून दि. 28 नोक्हेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत अभय योजना लागू करण्यात आली होती. मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे करवसुली आणि कारवाई करण्यात आली. या योजनेअंतर्गत शास्ती, नोटीस फी व वॉरंट फीमध्ये शंभर टक्के सवलत देण्यात आली. या योजनेस शहरातील मिळकतदारांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, दि. 28 नोक्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत शेवटच्या दिवस अखेर 34 दिवसांमध्ये एकूण 68 कोटी 35 लाख 74 हजार 158 रुपये कर जमा झाला आहे. महापालिका प्रशासनाने 100 कोटी करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. शास्ती माफीसह (सूट) एकूण 108 कोटी रुपये कर जमा झाला आहे. ‘अभय योजने’अंतर्गत 34 दिवसांत शास्ती माफीसह(सूट) एकूण 108 कोटी रुपये कर महापालिका तिजोरीत झाला. 100 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल नववर्षआरंभी मध्यरात्री महापालिका कार्यालयात 100 कोटी लिहिलेला केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपायुक्त आशीष लोकरे, मिळकतकर विभागाचे अध्यक्ष युवराज गाडेकर यांच्यासह करनिरीक्षक क अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आता कोणतीही सवलत मिळणार नाही

मिळकतकराच्या बिलाकर लावण्यात आलेली नोटीस फी, वॉरंट फी व शास्तीमध्ये 100 टक्के सवलत देण्याची अभय योजनेची मुदत रविवारी रात्री संपली आहे. आता कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोलापूर महापालिकेच्या मिळकत करापोटी आतापर्यंत एकूण 743 कोटी रुपये थकबाकी आहे. यामध्ये दुबार क इतर बाबी वगळता साधारणतः 500 कोटींची थकबाकी निघेल. ‘अभय योजने’तून साधारणत 100 कोटी रुपये कर भरण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. या योजनेअंतर्गत 34 दिवसांच्या मुदतीत शास्ती माफीसह (सूट) एकूण 108 कोटी रुपये कर महापालिका तिजोरीत जमा झाला.