क्रीडा संस्कृतीला नववर्षात वेग; अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन

हिंदुस्थानात क्रीडा संस्कृती आता वेगाने रुजू लागलीय. खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतोय. हळूहळू का होईना ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे वैयक्तिक सुवर्णपदकाचे खातेही उघडू लागले आहे. 2024 हे ऑलिम्पिक वर्ष असल्यामुळे हिंदुस्थानातही मोठमोठय़ा स्पर्धांचे आयोजन केले जातेय. केवळ क्रिकेटच नव्हे तर आता हॉकीसह बॅडमिंटन, टेनिस, बुद्धिबळ आणि ग्रांप्रिच्या जागतिक स्पर्धा हिंदुस्थानात खेळविल्या जाणार आहेत.
पॅरिसमध्ये होणाऱया ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी वर्षाच्या प्रारंभीच हॉकीची पात्रता फेरी रांची ठेवली आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून हिंदुस्थानच्या महिला आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्न करतील. हिंदुस्थानात अन्य खेळांनाही प्रचंड महत्त्व प्राप्त झाल्यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयोजनाला देशाच्या वेगवेगळय़ा शहरांमध्ये सुरुवात होणार आहे. या खेळांबरोबर क्रिकेटचेही घमासान आहेच.
हिंदुस्थानचा क्रीडा कॅलेंडर 
13-19 जानेवारी हॉकी ऑलिम्पिक पात्रता फेरी (रांची)
16-21 जानेवारी इंडिया ओपन बॅडमिंटन, नवी दिल्ली
23-28 जानेवारी डब्ल्यूटीटी स्टार्ट पंटेंडर, गोवा
3-9 फेब्रुवारी प्रो हॉकी लीग (महिला), भुवनेश्वर
10-16 फेब्रुवारी प्रो हॉकी लीग (पुरुष), भुवनेश्वर
12-18 फेब्रुवारी प्रो हॉकी लीग (महिला),  राऊरकेला
1925 फेब्रुवारी प्रो हॉकी लीग (पुरुष), राऊरकेला
12-14 एप्रिल सॅफ ज्युनियर अॅथलेटिक्स, चेन्नई
1-14 जून विश्व ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद, नवी दिल्ली
20-22 सप्टेंबर इंडियन ग्रां प्रि मोटो ग्रेटर नोएडा
4-6 ऑक्टोबर सीनियर अॅथलेटिक्स अजिंक्यपद, रांची
26 नोव्हें-1 डिसेंबर सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन, लखनौ
3-8 डिसेंबर इंडिया सुपर 100 बॅडमिंटन
10-15 इंडिया सुपर 100 बॅडमिंटन