मराठी कलाकार नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. नववर्षाचे स्वागत करताना त्यांनी स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ देण्याचा संकल्प केला आहे.
भरपूर पुस्तके वाचणार
अभिनेत्री श्वेता मेहेंदळे म्हणाली, दरवर्षी मी ठरवते की आठवडय़ाला एक पुस्तक म्हणजेच वर्षाला 52 पुस्तक वाचून झालीच पाहिजेत. हा संकल्प मी अनेक वर्षांपासून करतेय, पण अजून तो पूर्ण झालेला नाही. 2024मध्ये 52 पुस्तके वाचून पूर्ण करायचा संकल्प मी पूर्ण करणार आहे. दुसरा संकल्प आहे की, 2023मध्ये कोकण आणि गोवा अशा राईड्स केल्या होत्या, तर नव्या वर्षात लांबची राईड
करायची आहे.