दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रवींद्र जाडेजा पॅरिसमध्ये सुट्टीचा घेतोय आनंद, फोटो व्हायरल

विश्वचषक 2023 नंतर टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची T20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेत युवा खेळाडूंनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बीसीसीआयने या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असून युवा खेळाडूंना संधी दिली आहे. रवींद्र जाडेजा देखील अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान आता रवींद्र जाडेजाही त्याची सुट्टी पॅरिसमध्ये घालवत आहे.

इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत कर्णधार असेल. मात्र रवींद्र जडेजा दौऱ्यावर जाण्यापूर्वी सुट्टीचा आनंद घेत आहे. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून ब्रेक घेतला. तो पॅरिसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. यावेळीचे रवींद्र जाडेजाने इंस्टाग्रामवर 2 फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये जाडेजा काळ्या कपड्यांमध्ये लूक दिसत आहे. त्याने काळी टोपी, जॅकेट, पँट आणि चष्मा घातलेला दिसत आहे. यावेळी तो पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरजवळ उभा राहून पोज देताना दिसत आहे.

दरम्यान, याआधी जडेजा व्यतिरिक्त इंडिया संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्टी साजरी करत आहे. विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत लंडनमध्ये ब्रेक एन्जॉय करत आहे. यांचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच इंडिया संघाने आत्तापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-1 असा पराभव करत मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील अंतिम सामना आता आज बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.