जम्मू-कश्मीर येथील सुप्रसिद्ध वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2 जण जखमी झाले आहेत. जखमींना नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ही घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली आहे. दरवर्षी नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी वैष्णो देवी मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. येथे त्यांच्यासाठी विशेष सोयी देखील उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, शनिवारी सकाळी क्षमतेपेक्षा जास्त भाविक या ठिकाणी जमा झाल्याची माहिती मिळत आहे.
Jammu & Kashmir | Stampede at Mata Vaishno Devi Bhawan. Injuries reported; rescue operation underway: Police Control Room, Reasi
(file photo) pic.twitter.com/WqQidw16vF
— ANI (@ANI) December 31, 2021
दर्शनाला झालेल्या झुंबडीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि 14 जण जखमी झाले. मात्र, त्यातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कटरा रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून प्रत्येकी दोन लाख रुपये इतकी मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजार इतकी रक्कम मदत म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to the stampede at Mata Vaishno Devi Bhawan. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 1, 2022