नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान प्रक्रिया विभागात शांततेत सुरळीतपणे पार पडली.नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील 69 हजार 368 मतदानापैकी 64 हजार 846 इतके मतदान झाले असून 93.48 टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा व अपर आयुक्त निलेश सागर यांनी दिली.

विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 25 हजार 302 मतदारापैंकी हजार 23 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 91.63 टक्के मतदान झाले आहे. नगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदारापैंकी 16 हजार 327 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान झाले आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 8 हजार 159 मतदारापैंकी 7 हजार 651 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 93.77 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 13 हजार 122 मतदारापैंकी 12 हजार 500 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 95.26 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण 5 हजार 393 मतदारापैंकी 5 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 96.12 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.