ऐकावं ते नवलच! उद्योगपतीचे नसते उद्योग; 91व्या वर्षी लग्न केल्याने कंबर, पाठदुखी वाढली!

बालपण, शिक्षण आणि लग्न योग्य वयात झाल्यास योग्य असते, असे थोरामोठय़ांचे बोल आहेत. परंतु आता काळानुसार सर्वकाही बदलले आहे. हिंदुस्थान वगळता अन्य देशांत लग्न करायला काही बंधने नाहीत. ऑस्ट्रियामधील एका उद्योगपतीने 91 व्या वर्षात 42 वर्षांनी लहान असलेल्या एका महिलेशी लग्न केले. रिचर्ड लुगनर असे या उद्योगपतीचे नाव आहे, तर 42 वर्षांनी छोटी असलेल्या महिलेचे नाव सिमोन रेलेंडर असे आहे. परंतु लग्नाच्या काही महिन्यांनंतरच रिचर्स लुगनर यांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत आहे, असे त्यांनी सांगितले. पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असह्य झाल्याने लुगनर यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पाठदुखी आणि कंबरदुखीबद्दल बोलताना लुगनर म्हणाले की, मला वाटते यामागे जीममध्ये बाईकवरचा व्यायाम असू शकतो. पाठदुखी आणि कंबरदुखी झाली होती. त्यानंतर मी मालिश करणाऱयांकडून मालिश करून घेतली. परंतु मालिशमुळे आराम मिळण्याऐवजी माझी पाठदुखी आणि पंबरदुखी जास्त वाढली आहे, असेही लुगनर यांनी सांगितले.

– रिचर्ड लुगनर यांनी याआधी जर्मन टीव्ही प्रेझेंटर आणि माजी प्लेबॉय मॉडल पॅथी शमित्ज या महिलेशी विवाह केला होता.

कॅथी या रिचर्ड लुगनर यांच्यापेक्षा 57 वर्षांनी लहान होत्या. दोन वर्षे सोबत राहिल्यानंतर 2016 मध्ये हे दोघेही विभक्त झाले. रिचर्ड यांनी गेल्या वर्षी 42 वर्षीय सिमोन रेलेंडर यांच्याशी विवाह केला.

– पाठीची आणि कंबरेची मालिश करताना मला उलटे झोपवले होते. त्यामुळे माझ्या कमरेचे हाड मोडले असे मला वाटतेय, असेही ते म्हणाले. मला सध्या प्रचंड अस्वस्थ वाटतेय. मी बऱयाच दिवसांपासून घरीच आराम करत आहे. परंतु मी लवकरच बरा होईल, असा आशावादही लुगनर यांनी व्यक्त केला आहे.