अवघ्या देशभरात नोकरदार वर्गात अस्वस्थता आहे. हिंदुस्थानातील 88 टक्के कर्मचारी हे 2024 मध्ये नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी 4 टक्के अधिक आहे, अशी माहिती आघाडीचा नेटवार्ंकग प्लॅटफॉर्म लिंक्डइनच्या एका नव्या अहवालातून समोर आली आहे. आरोग्याची हेळसांड नको आणि जास्त पगारवाढ असावी, ही दोन प्रमुख कारणे नोकरी बदलामागे आहेत.
लिंक्डइन डेटाच्या माहितीनुसार, 2023 मध्ये या प्लॅटफॉर्मवर नोकरी शोधण्यासाठी वार्षिक आधारावर 9 टक्के वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार, आव्हानात्मक वातावरणात चांगले आरोग्य असायला हवे, असे 42 टक्के आणि वाढीव पगार मिळावा यासाठी 37 टक्के कर्मचारी नोकरी बदलाच्या विचारात आहेत, असे लिंक्डइन इंडिया करीअर तज्ञ निरिजिता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
-मनासारखी नोकरी कशी मिळवायची, असा 45 टक्के प्रोफेशनल्ससमोर प्रश्न.
– नोकरी शोधण्याची प्रक्रिया कठीण झाल्याचे मत.
– 2015 नंतर नोकऱयांमधील काwशल्यात बदल. प्रोफेशनल्सला नोकरी शोधणे कठीण.
– नोकरी शोधणे 55 टक्के लोकांना निराशाजनक वाटते.
– 72 टक्के लोकांनी नोकरी शोधण्यासाठी आपला दृष्टिकोन बदलला.
– नोकरी शोधण्यास आणि अधिक काwशल्यपूर्ण बनवण्यास एआय मदत करू शकते, असे 81 टक्के लोकांना वाटते.