इटलीच्या सेवानिवृत्तीगृहात रात्री भीषण आग, 6 मृत्युमुखी.. 80 जखमी

 इटलीतील मिलान येथील  एका सेवानिवृत्तीगृहात रात्री लागलेल्या आगीत सहाजणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 80 जण जखमी झाले, त्यात तिघांची प्रकृती गंभीर आहे, असे इटलीच्या सूत्रांकडून  शुक्रवारी सांगितले. ही आग पहिल्या मजल्यावरील एका खोलीत लागली. पण ती त्वरित विझवण्यात आली. त्यामुळे  इमारतीच्या इतर भागात आग  पसरली नाही, तरीही मोठ्या प्रमाणात विषारी धुर निर्माण झाले. दोन रहिवाशांचा त्यांच्या खोलीत जळून मृत्यू झाला, तर इतर चार जण धुरामुळे गुदमरून  मरण पावले, असे मिलानचे महापौर जियूसेपे साला यांनी घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. “ही अत्यंत दुख:द घटना आहे. , सहा जणांचा मृत्यू हा खूप मोठा आकडा आहे,” साला म्हणाले. या निवृत्तीगृहात  167 लोक राहतात.

अग्निशामक दलाचे प्रमुख  लुका कॅरी म्हणाले की आग का लागली याचा शोध घेतला  जात आहे, परंतु हा अपघात असावा. स्थानिक वेळेनुसार रात्र 1 वाजता अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.  त्यांनी सुमारे 80 लोकांना बाहेर काढले,  तर  त्याहून  अधिक लोकांना रुग्णालयात नेण्यात आले, स्थानिक अग्निशमन दलाचे प्रमुख निकोला मिसेली यांनी  सांगितले. प्रचंड धुरामुळे बचाव कार्य खूपच क्लिष्ट झाले. बरेच रहिवासी मदतीशिवाय उभे राहू शकत नव्हते.

येथील  स्थानिक रहिवासी लुसिया म्हणाली की तिने काहींना त्यांच्या खिडक्यांमधून मदतीसाठी हाका मारताना पाहिले.