दिल्लीत दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, चार जणांना अटक

दिल्लीमध्ये दोन हजार कोटी रुपयांचे 560 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. देशाच्या राजधानीत आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई आहे. यात प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मागे आंतरराष्ट्रीय टोळी आहे. रविवारी पोलिसांनी 400 ग्रॅम हिरॉईन आणि 160 ग्रॅम कोकेन सापडल्या प्रकरणी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती. त्याच दिवशी इंदिरा गांधी विमानतळावर 24 कोटी रुपयांची दीड हजार ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले होते.