अतिसारामुळे देशात दरवर्षी 50 हजार बालकांचे मृत्यू

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘स्टॉप डायरिया मोहिमे’मध्ये रेकीटचा नवीन माता आणि पाच वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी सेल्फ केअर हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये, बालपणातील अतिसाराचे आजार हे पाच वर्षांपेक्षा लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरले आहे. दरवर्षी देशातील 50 हजार मुले अतिसारामुळे मृत्यू पावतात.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी गेल्या आठवडय़ात सुरू केलेल्या या मोहिमेचे उद्दिष्ट देशात अतिसारामुळे होणारे बालमृत्यू बंद करणे हे आहे. एनएफएचएस-5 नुसार, पाच वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये अतिसाराचे प्रमाण 7.3% आहे; तर फक्त 60.6% लोकांना ओआरस आणि 30.5% जस्त मिळाले आहे. 68.9% प्रकरणांमध्ये, वैद्यकीय सुविधा किंवा प्रोव्हायडर यांचा सल्ला घेण्यात आला. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, रेकीट या उपक्रमाद्वारे प्लॅन इंडियाच्या भागीदारीत – नवीन माता आणि पाच वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी स्वतःची काळजी, ओआरस आणि झिंकचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे आणि 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना स्वच्छता आणि हायजीनचे महत्त्व सहा टप्प्यांमधून सांगण्यात येत आहे. दोन महिन्यांची मोहीम महाराष्ट्र, गुजराज, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये हात धुण्याचे महत्त्व, ओआरस प्रात्यक्षिके, समाजाचा सहभाग, सक्रिय उपाय आणि अत्यावश्यक अतिसार किटचे वितरण या माध्यमातून समाजातील सदस्यांना याबाबत शिक्षण देण्यावर भर देणार आहे, असे रेकीटचे दक्षिण आशियाचे कार्यकारी उपप्रमुख गौरव जैन यांनी सांगितले.