इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील 38 ठार तर, 54 जण जखमी

दहशतवादी संघटना हिजबुल्लाहविरोधात सुरू असलेल्या युद्धात बुधवारी इस्त्रायलने लेबनॉनच्या बेका घाटीच्या पूर्व शहर बालबेकजवळ 38 जणांचा खात्मा केला आहे. बेरुतच्या दक्षिणी उपनगरांमध्ये इस्त्रायलकडून हल्ले करण्यात आले. बेरुतचे गव्हर्नर बाचिर खोदर यांनी एक्सवर सांगितले की, बाललेक गव्हर्नररेटवर जवळपास इस्त्रायलच्या 40 हल्ल्यांमध्ये 38 जण मारले गेले आणि 54 जखमी झाली आहेत. इस्त्रायली सैन्याने त्यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

इस्त्रायलच्या सैन्याने बुधवारी सकाळी सांगितले की, इस्त्रायली शहर मेटुलावर रॉकेट हल्ला करणारा हिजबुल्लाह कमांडर हुसैन अब्द अल-हमीम बर्ब दक्षिणी लेबनॉनमध्ये ठार झाला आला. सोबत उत्तर पश्चिमी इराणच्या एका न्यायालयाने इस्त्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली चार लोकांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. पण ते आरोपी नेमके कोणत्या देशातले आहेत याबाबत कोणती माहिती दिलेली नाही.