वसई-विरार महापालिकेतील 29 गावे वगळणार नाही

वसई-विरार पालिकेतील 29 गावे न वगळण्याचा निर्णय मिंधे सरकारने घेतला आहे. ती गावे वगळण्यासंदर्भातील याचिकेवर उद्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र आजच मिंधे सरकारने ती गावे पालिकेतच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तशी अधिसूचनाही सरकारने प्रसिद्ध केली. त्यामुळे उद्या न्यायालय काय निर्णय देणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वसई-विरार पालिकेतून 29 गावे वगळण्याचा अध्यादेश राज्य शासनाने 2011 मध्ये काढला होता, त्याला पालिकेने आव्हान देत स्थगिती मिळवली होती. तेव्हापासून गावे वगळण्याचे हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उद्या यावर निकाल आहे. त्याआधीच ही गावे पालिकेतच कायम ठेवण्याची भूमिका मिंधे सरकारने घेतली. अधिसूचनेवर पुढील 30 दिवसांत हरकती नोंदविता येणार आहेत.