हिंदुस्थान आणि फ्रान्स यांच्यात 26 राफेल मरीन फायटर जेट खरेदीबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. हा करार आता जवळपास निश्चित झाला आहे. असं समजतंय की, फ्रान्सने या कराराची रक्कम कमी केली आहे. मात्र तरी हिंदुस्थान ‘राफेल’ कितीला खरेदी करणार, याची माहिती समोर आलेली नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या आठवडय़ात पॅरिस दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने किंमत कमी करण्यास तयारी दर्शवली आहे.
जेटची वैशिष्टय़े…
हिंदुस्थानातील राफेल लढाऊ विमानांपेक्षा राफेल मरीन अधिक प्रगत आहे. त्याचे इंजिन अधिक शक्तिशाली आहे. त्यामुळे ते आयएनएस विक्रांत या लढाऊ विमानावरून स्की जंप करू शकते. ते अगदी खालच्या ठिकाणीही उतरू शकते.
– राफेल जेट 15.27 मी. लांब, 10.80 मी. रुंद, 5.34 मी. उंच आहे. त्याचे वजन 10,600 किलो आहे.
– त्याचा वेग 1,912 किमी प्रतितास आहे. त्याची रेंज 3700 किमी आहे. ते 50 हजार फूट उंचीपर्यंत उडते.
– अँटिशिप स्ट्राइकसाठी हे सर्वोत्तम मानले जाते.