Video – बॅनर लावताना 25 वर्षीय तरुणीचा शॉक लागून मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

बॅनर लावताना एका 25 वर्षीय तरुणीला शॉक लागला आहे. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.

हैदराबादच्या एलबी नगरमध्ये 25 वर्षीय चिलुमाला अरुणा एका खासगी कन्सल्टन्सीमध्ये काम करत होती. अरुणा आणि तिचे साथीदार कंपनीचा बॅनर लावत होते. तेव्हा तिला विजेचा जोरदार शॉक बसला. या शॉकमुळे अरुणा बेशुद्ध झाली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपाचारपुर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.