बारावी परीक्षेतील मराठीसह हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या मुख्य भाषा विषयांमध्ये राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची दांडी गुल झाली आहे. विद्यार्थ्यांना या हिंदुस्थानी भाषांमध्ये गुण मिळविणे अवघड वाटत असून त्यापेक्षा फॉरेन लंग्वेज विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवून देत असल्याचे यंदाच्या निकालातून समोर आले आहे.
राज्यातील सर्वाधिक 14 लाख 89 हजार 924 विद्यार्थ्यांनी इंग्रजीची परीक्षा दिली. त्यापैकी 13 लाख 99 हजार 891 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून भाषा विषयांमध्ये सर्वात कमी निकाल 93.96 टक्के इंग्रजीचा लागला आहे. हिंदी विषयाचा निकाल 96.04 टक्के असून 3 लाख 47 हजार 809 विद्यार्थी पास झाले आहेत. मायमराठीचा निकाल 96.96 टक्के आहे. मराठीत 8 लाख 14 हजार 415 विद्यार्थ्यांपैकी 7 लाख 89 हजार 671 जण पास झाले आहेत, तर उर्दू भाषेचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. 5 भाषा विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात मल्याळम, तेलगू, पंजाबी, रशियन, स्पॅनिश या विषयांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना हे विषय सोप्पे
विद्यार्थ्यांना सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, सोशोलॉजीपेक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषय सोप्पे ठरले आहे. यंदा आर्टस् शाखेचा निकाल सर्वात कमी लागला आहे. आर्टस् शाखेतील विविध विषयांच्या निकालावर नजर टाकली असता सायन्स शाखेच्या मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांपेक्षा यंदा इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, सोशोलॉजी, सायकॉलॉजी या विषयांचा तसेच कॉमर्समधील बुक कीपिंग अॅण्ड अकाऊंट्स, सेव्रेटरियल प्रॅक्टिस विषयांचा निकाल कमी आहे.
नापासांची संख्या
मराठी 24,744
इंग्रजी 90,033
हिंदी 14,348
उर्दू 1380
विविध विषयांच्या निकालाची टक्केवारी
फिजिक्स 98.69
केमिस्ट्री 99.04
बायोलॉजी 98.93
मॅथ 97.81
इकॉनॉमिक्स 92.12
हिस्ट्री 92.99
सोशोलॉजी 93.46
सायकॉलॉजी 93.22
बुक कीपिंग अॅण्ड
अकाऊंट्स 91.95
सेव्रेटरियल प्रॅक्टिस 92.74