लष्कर-ए-तैयबा या संघटनेशी संबंधित दोन दहशतवादी मारले गेले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कश्मीर खोऱ्यातील ऑपरेशनल कमांडर रियाझ शेत्री आणि त्याचा सहकारी रईस दार अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.
रियाझ 2015 पासून सक्रिय होता. निश्चित हत्या, ग्रेनेड हल्ले आणि दहशतवादी भरती यासह 20 हून अधिक दहशतवादी-संबंधित घटनांमध्ये त्याच्या भूमिकेसाठी त्याला A+ म्हणून वर्गीकृत करण्यात आलं होतं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याच्यावर 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.