शिवसेना भवनाच्या प्रांगणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

आज देशाचा 78 वा स्वातंत्र्यदिन. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दादर येथील शिवसेना भवनाच्या प्रांगणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार अजय चौधरी, आमदार सचिन अहिर, आमदार अॅड. अनिल परब,  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सचिव वरूण सरदेसाई, शिवसेनेचे नेते, उपनेते, विभागप्रमुख, पदाधिकारी यासह असंख्य शिवसैनिक आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.

हे वाचा – बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला; संजय राऊत यांचा घणाघात

15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी असंख्य देशभक्तांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. देशासाठी प्राणांची आहुती दिली. शिवसेनेनेही देशाभिमान सदैव जपला. 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकवून देशाप्रति आदर व्यक्त केला जातो. याच निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिली गेली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)