पहिल्या दिवशी 14 हजार; भाविकांनी घेतले बाबा बर्फानींचे दर्शन

अमरनाथ यात्रेकरूंच्या कारला अपघात
अमरनाथ यात्रेच्या दुसऱया दिवशी, रविवारी जम्मूतील भगवती नगर बेस क@म्प येथून 6,619 यात्रेकरूंची तिसरी तुकडी दोन वेगवेगळ्या ताफ्यांमध्ये रवाना झाली. यावेळी पहलगाम मार्गावर एका कारला अपघात झाला, ज्यामध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. दोघे झारखंड राज्यातील असून विजय मंडल आणि गुरवा देवी अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी डीआरडीओ रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्यांना जीएमसी रुग्णालयात पाठवण्यात आले.

रविवारी निघालेल्या तिसऱया तुकडीत 1141 महिलांचा समावेश आहे. ते सर्व 319 गाडय़ांमधून पहाटे 3.50 वाजता निघाले. आतापर्यंत 3838 यात्रेकरू चंदनवाडी, पहलगाम मार्गावरून तर 2781 यात्रेकरू बालटाल मार्गावरून हिम-शिवलिंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत.

चोख बंदोबस्त
9 जून रोजी जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 10 भाविक ठार झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांची 13, एसडीआरएफची 11, एनडीआरएफची आठ, बीएसएफची चार आणि सीआरपीएफची दोन पथके दोन्ही मार्गावरील उच्च सुरक्षा बिंदूंवर तैनात आहेत. याशिवाय निमलष्करी दलाच्या 635 कंपन्या तैनात आहेत.

– बाबा बर्फानी यांच्या दर्शनासाठी दरवर्षी काढण्यात येणाऱया पवित्र अमरनाथ यात्रेला 29 जूनपासून सुरुवात झाली आहे. यंदा अमरनाथ यात्रेसाठी 3.50 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. पहिल्या दिवशी 14 हजार यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेत बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. 52 दिवसांचा हा प्रवास 19 ऑगस्टला संपणार आहे.