13 जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; ससूनमध्ये कोट्यवधींचा अपहार

ससून रुग्णालयाच्या बँक खात्यातून – चार कोटी रुपयांचा अपहार – करणाऱ्या 13 जणांचा अटकपूर्व – जामीन अर्ज सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी फेटाळला. रोखपाल सुलक्षणा ससूनमध्ये चाबुकस्वार, नीलेश कोट्यवधींचा – शिंदे, सुमन वालकोळी, – अर्चना अलोटकर, अपहार – दीपक वालकोळी, संतोष जोगदंड, – दयाराम कछोटिया, श्रीकांत श्रेष्ठ, – उत्तम जाधव, संदीप खरात, अनिता शिंदे, शेखर कोलार, राखी शहा – अशी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल आहे.

रुग्णालयाच्या खात्यातून आरोपींनी 4 कोटी 18 लाख 62 हजार 942 रुपये काढून ते खात्यावर वळवून अपहार केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी 13 जणांनी अर्ज दाखल केला. या अर्जाला अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. गुन्ह्याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे, असा अॅड. पाठक यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला.