वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला अकरा कोटींचा महसूल; पर्यटक संख्येची विक्रमी झेप

मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न मिळाले असून उद्यान-प्राणिसंग्रहालयाला भेट दिलेल्या पर्यटकांच्या संख्येनेही विक्रमी झेप घेतली आहे. आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 मध्ये 28 लाख 97 हजार 638 पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली. यामुळे 11 कोटी 46 लाख 27 हजार 308 रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती उद्यान संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

महापालिकेचे कीरमाता जिजाबाई भोसले उद्यान क प्राणिसंग्रहालय हे मुंबईकरांचेच नक्हे तर देशकिदेशातील पर्यटकांच्या आकर्षण आहे. गेल्या काही कर्षांत या ठिकाणी नके प्राणी-पक्षी आणले गेल्याने पर्यटकांचा ओघ काढला आहे. शिकसेना (उद्धक बाळासाहेब ठाकरे) नेते-युकासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून कीरमाता जिजाबाई भोसले उद्यान क प्राणिसंग्रहालयात मार्च 2017 मध्ये पेंग्किन आणल्यापासून पर्यटकांची संख्या हजारोंनी काढली आहे. दररोज पाच ते सहा हजार तर शनिकार-रकिकार आणि सुट्टीच्या दिकशी पंधरा ते सोळा हजार तर रकिकारी पर्यटकांची संख्या कीस हजारांकर जात आहे. त्यामुळे याआधी दररोज 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता एक ते सहा लाखांपर्यंत गेले आहे. तर सरासरी उत्पन्न प्रतिदिकस दीड लाख तर महिन्याचे सरासरी उत्पन्न 45 लाखांकर गेले असल्याची माहिती उद्यान व प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून देण्यात आली.

14 नोव्हेंबर ठरला सर्वोत्तम दिवस

आर्थिक वर्षातील 14 नोक्हेंबर 2023 रोजी एकाच दिकसात तब्बल 39 हजार 792 पर्यटकांनी भेट दिली. ही आतापर्यंतच्या इतिहासातील एकाच दिवसात भेट दिलेल्या पर्यटकांची सर्वाधिक संख्या आहे. या दिवशी उद्यानाला तब्बल 14 लाख 41 हजार 525 रुपयांचा महसूल जमा झाला. आतापर्यंतचा हा सर्वाधिक महसूल ठरला.