हिंदुस्थानात 11.70 लाखांहून अधिक शाळाबाह्य मुले असल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिली. ही आकडेवारी आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या आठ महिन्यांतील आहे. सोमवारी सभागृहात एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना पेंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी शाळाबाह्य मुलांची आकडेवारी सांगितली. उत्तर प्रदेशात शाळाबाह्य मुलांची संख्या सर्वाधिक असून, झारखंड दुसऱया क्रमांकावर आहे. जयंत चौधरी यांनी सार्वजनिक केलेल्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानात एकूण 11,70,404 मुले शाळाबाह्य म्हणून ओळखली गेली आहेत. या यादीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानी असून, इथे 7.84 लाख मुले शाळाबाह्य नोंदवली गेली. तर झारखंडमध्ये 65,000 हून अधिक आणि आसाममध्ये 63,000 हून अधिक शाळाबाह्य मुलांची नोंद आहे.