एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एअर हॉस्टेसला अटक, गुप्तांगात लपवले होते किलोभर सोने

केरळ येथे अनोखे प्रकरण समोर आला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एका एअर हॉस्टेसला केरळ येथील कन्नूर विमानतळावर अटक करण्यात आली आहे. या हॉस्टेसने 1 किलो सोने गुप्तांगात लपवून त्याची तस्करी करत असताना अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयात उभे केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सुरभी खातून असे त्या एअर हॉस्टेसचे नाव असून ती कोलकाताची रहिवासी आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस विमान मस्कत येथून कन्नूर येथे 28 मे ला लॅण्ड झाले होते. त्यावेळी महसूल गुप्तचर संचालयाच्या (डीआयआर) यांना मिळालेल्या माहितीनुसार तिला विमानतळावर रोखण्यात आले होते. तिची तपासणी केली असता तिच्याकडून 960 ग्रॅम सोनं गुप्तांगात लपवलेले सापडले. ती एअर इंडिया एक्स्प्रेससाठी काम करते. सुरभीकडून कन्नूर विमानतळावर हे सोनं जप्त करण्यात आले आहे. तिला न्यायालयात उपस्थित केले असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्य़ा माहितीनुसार, हिंदुस्थानातील हे असे पहिले प्रकरण आहे, जिथे एका एअर लाईन्सच्या क्रू मेंबरने असे कृत्य केले आहे. अहवालानुसार, सुरभी खातून हिची कसून चौकशी केली असता तिने याआधी अनेकदा सोन्याची तस्करी केली आहे.