‘मसाज’साठी गेलेला नवरा ‘तसला’ आजार घेऊन आला, भडकलेल्या बायकोने केले तांडव

मसाजसाठी वारंवार मसाज पार्लरला जाणाऱ्या एका पुरुषाला ‘तसला’ आजार झाला. हे कळाल्यानंतर त्याची बायको त्याच्यावर जाम भडकली असून तिचा राग कॅनडा सरकारवरही निघाला आहे.  स्वत:चे नाव जगजाहीर करण्यात अजिबात रस नसल्याने या महिलेचे नाव कळू शकलेलं नाही. आपल्या नवऱ्याला स्पा सेंटर, मसाज सेंटरला जायचा छंद जडला होता, तो वरचेवर या सेंटरवर जात होता आणि तिथूनच त्याला हा आजार जडला असल्याचं महिलेचं म्हणणं आहे. स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असून तिथे कोणतीही काळजी न घेता शारीरिक संबंध ठेवल्याने नवऱ्याला हा आजार झाल्याचा पक्का संशय या महिलेला आहे.

रिचमंड न्यूज या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटलंय की सुदैवाने या महिलेला या आजाराची लागण होण्यापूर्वीच नवऱ्यावर उपचार करण्यात आले. असं असलं तरीही मला पेनिसिलीनची दोन इंजेक्शने पार्श्वभागावर टोचून घ्यावी लागली असं महिलेने सांगितलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे ही महिला संतापली असून इच्छेविरूद्ध कॅनडात अशा कितीतरी मुली काम करत असतील, सरकारला याची कल्पनाच नाहीये का असा प्रश्न तिने विचारला आहे.

आपल्याला हा आजार कुठे गेल्याने झाला हे नवऱ्याने महिलेला सांगितल्यानंतर तिने त्याचा फोटो घेऊन थेट ते मसाज सेंटर गाठलं. आपल्या नवऱ्याचा फोटो तिथल्या सगळ्या महिलांना दाखवत तिने दम दिला की, यापुढे जर हा माणूस इथे आला आणि जर तुम्ही त्याला सर्व्हीस दिलीत तर याद राखा. डेली स्टार नावाच्या वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.